| मुंबई | प्रतिनिधी |
काँग्रेसला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी आपल्या वाराणसी मतदारसंघात पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे असे ही ते म्हणाले आहेत.
काँग्रेसला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी आपल्या वाराणसी मतदारसंघात पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे असे ही ते म्हणाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत एनडीएला बहुमत मिळेल असे दिसत नाही असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. एक्झिट पोलवर टीका करताना त्यांनी हे सर्व मोदी मीडिया पोल होते अशी टीका केली आहे. ते सर्व मोदी मीडिया पोल होते. तो गुजरातच्या व्यापाऱ्यांचा शेअर बाजार होता. तो आज कोसळताना दिसत आहे. आम्ही सातत्याने देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन होईल असं सांगत आहोत. आता फक्त कल सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे देशाचे पंतप्रधान पहिल्या 3 फेरीत पिछाडीवर होते, हाच कल आहे. जो लागायचा तो निकाल लागेल. पण प्रत्यक्ष भगवान, ईश्वराचे अवतार, काशीपुत्र हे 3 फेऱ्यात पिछाडीवर होते. हा उत्तर प्रदेश नव्हे तर देशाचा कल आहे. 2 वाजता चित्र स्पष्ट होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. जर नरेंद्र मोदी पिछाडीवर राहिले असतील तर हाच ट्रेंड आहे. अजिंक्य, अजेय आणि ईश्वराचे अवतार वाराणसीत पिछाडीवर होते हाच देशाचा ट्रेंड आहे अशी टीकाही त्यांनी केली.