दिल्लीतील मोदींची सत्ता जाणार: नाना पटोले

। मुंबई । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागला आहे. जातीधर्मात फूट पाडणार्‍या महायुतीला सत्तेतून तडीपार करा. राज्यात महाविकास आघाडी जिंकली तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राला भाजपायुती सरकारने संकटात लोटले असून शिंदे, फडणवीस व अजित पवार यांनी दिल्लीत बसलेल्या मोदी, शाह यांना महाराष्ट्र लुटून देण्याचे पाप केले आहे. महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भाजपा महायुती सरकारने भ्रष्टाचार करून शिवाजी महाराज व कोट्यवधी शिवप्रेमींचा अपमान केला आहे. मनुवादी प्रवृत्तींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Exit mobile version