उरणच्या मोहितला टेक्नो 293 स्पर्धेत रौप्यपदक


| उरण | प्रतिनिधी |

भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उरणच्या मोहित म्हात्रे यांनी 25 ते 29 नोव्हेंबर 2025 जॉम्टियन बीच दरम्यान पटाया, थायलंड येथे आयोजित टेक्नो 293 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मोहितने अप्रतिम कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर रौप्यपदक जिंकत देशाला मोठा सन्मान मिळवून दिला आहे. वयाच्या केवळ 13 वर्षांमध्ये मोहितनी विंडसर्फिंग क्रीडा प्रकारात कसून मेहनत, धैर्य आणि उत्कृष्ट स्पर्धात्मकता दाखवत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या सिंगापूर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर, मोहितने टेक्नो 293 एशियन चॅम्पियनशिपमध्ये प्रभावी कामगिरी केली होती.

2530 नॉट्स कठीण आणि धोकादायक वाऱ्याचा सामना करताना मोहितने अप्रतिम धैर्य, अचूक तंत्र आणि प्रचंड मानसिक स्थैर्य दाखवले
15 आशियाई देशांतील अव्वल खेळाडूंसमोर मोहितने आपली असामान्य क्षमता सिद्ध केली. अंडर-15 गटातून भारताचे प्रतिनिधित्व करताना मोहितने सर्व 15 शर्यती यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यांनी आठ शर्यतीत प्रथम क्रमांक तीन शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावला.

अंतिम दिवशीही त्याने उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत 13 आणि 14 व्या शर्यतीत पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला. मोहितचे मुख्य प्रशिक्षक संदीप म्हात्रे, प्रशिक्षक चेन्हाई यांचे त्याला सततच्या मार्गदर्शनासाठी, समर्थनासाठी आणि उच्च उद्दिष्टांच्या दिशेने प्रेरित केल्याबद्दल मनापासून आभार मानले.

Exit mobile version