मोहोपाडाकर श्रीगणेशाच्या जयघोषात तल्लीन

। रसायनी । वार्ताहर ।

नववर्षांच्या पहिल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त मोहोपाडा ते वरदविनायक महड पदयात्रेचे आयोजन हभप मारुती महाराज खाने यांच्यावतीने करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही ही पदयात्रा डोंगरी भाग मोहोपाड्यातुन निघाली.

यावेळी सरपंच उमा मुंढे यांनी पालखीतील श्रीगणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन काही अंतर पालखी खांद्यावर घेऊन हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झाल्या. यानंतर पालखी चौक व बापदेव येथे पदयात्रेतील महिलांनी पारंपारिक गाण्यांवर भवर नाच केला. हरिनामाच्या गजरात टाळ, मृदुंगाच्या गजरात पालखी खालापूर, घोडीवली व महड येथे पोहचली. या पदयात्रेत जवळपास 400 भाविक सामील झाले होते.

Exit mobile version