मोइन अली घेणार कसोटीतून निवृत्ती

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंग्लंडचा आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोइन अली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच मोइन अली याची अधिकृत घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 34 वर्षीय मोइन अली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची कल्पना इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड आणि कर्णधार ज्यो रूट याला दिली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हिच योग्य वेळल असल्याची भावना मोइन अलीने बोलून दाखवली आहे. आगामी ट्वेन्टी-20 वर्ल्डकपसाठी निवड आणि त्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचे मोइन अलीने ठरवले आहे. सध्या मोइन अली यूएईमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधीत्व करत आहे. मोइन अली फ्रँचायझी क्रिकेट, इंग्लंडकडून वनडे आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट यापुढेही खेळणार आहे. तर फर्स्टक्लास क्रिकेटमध्येही मोइन अली खेळण्याचीही शक्यता आता कमीच आहे. मोइन अलीने इंग्लंडकडून आतापर्यंत 64 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले असून यात 2914 धावा, 5 शतकं आणि 14 अर्धशतकं ठोकली आहेत. तर 195 विकेट्स देखील मिळवल्या आहेत.

Exit mobile version