शरद मोहोळ हत्याप्रकरणात 16 जणांवर मोक्का

| पुणे | प्रतिनिधी |

गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 5 जानेवारी रोजी कोथरुडमध्ये मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडत शरद मोहोळ याचा खून केला होता. त्यानंतर पुण्यात खळबळ माजली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली होती. त्याचाच भाग म्हणून पुणे पोलिसांकडून आज 16 जणांविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version