। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सावंतवाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडिता नऊ वर्षांची असून, ती टीव्ही बघण्यासाठी शेजारी गेली होती. यावेळी त्या घरातील सतरा वर्षाच्या युवकाने काळोखाचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. याबाबतची माहिती पिडीतेने आपल्या घरी दिल्यानंतर संबंधित मुलीच्या नातेवाइकांनी येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, युवकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.