। अहमदनगर । वृत्तसंस्था ।
सोशल मीडियावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा. हा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. विनयभंग प्रकरणातील आरोपीला कोतवाली पोलिसांनी तीन तासात बेड्या ठोकल्या आहेत. गिरीष सुनिल वरकड असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
अहमदनगरमध्ये राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीशी आरोपीची स्नॅपचॅट अॅपवर ओळख झाली होती. अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये उभी होती. त्यावेळी आरोपी वरकड याने मुलीला उद्देशून हातवारे केले आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. याशिवाय पिडीता क्लासला जाता असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. शिवाय माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सोबत आली नाहीस, तर तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारेन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.