अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरी

| माणगांव | प्रतिनिधी |
अल्पवयीन आदिवासी मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपी नारायण पांडूरंग केंद्रे याला माणगाव न्यायालयाचे विशेष व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. पिडीत मुली या शाळेतील झाडावर पेरू काढण्याकरीता पाण्याच्या टाकीवर चढली असताना तिला नारायण केंद्रे याने घरी बोलावून केला होता. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव प्रविण पाटील यांनी केला.

सदर गुन्हयात पिडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली. अति शासकिय अभियोक्ता अ‍ॅड. योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले.तपास अधिकारी यु. एल. धुमास्कर, पोलिस उपनिरीक्षक छाया कोपनर, शशिकांत शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे, गोळे यांनी सहकार्य केले. आरोपीस 5 वर्ष सक्तमजूरी व रु. 5000/- दंड सह अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 अन्वये 3 वर्ष सक्तमजूरी व रू. 50000/- दंडाची शिक्षा ठोठावली.

Exit mobile version