अल्पवयीन मुलीचा विनयभंग

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

घरात कोणीही नसल्याची संधी साधून 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात संशयित प्रशांत चंद्रकांत दळवी (35) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी त्याला अटक करुन येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीची आई हॉटेलमध्ये कामाला गेली असल्याने घरी मुलगी एकटीच असल्याची संधी साधून संध्याकाळच्या सुमारास संशयिताने मुलीच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्याने त्या मुलीच्या पाठीवरुन हात फिरवत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती त्या मुलीने तिच्या आईला दिली. त्यानंतर आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संशयित प्रशांत चंद्रकांत दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक तपास महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक करत आहेत.

Exit mobile version