। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर तालुक्यातील लावेले येथील श्री स्वामी समर्थ मठाते भातपीक उत्पादनाचे निरीक्षण करण्यात आले. याआधी किसान क्राफ्ट कंपनी बंगलोरचे बियाणे नमून्याकरता शेतकर्यांना वितरित करण्यात आले. आशिष भिडे यांनी लावलेल्या 1007 ही भातपीक जात 125 ते 130 दिवसात कापण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिक शेतकर्यांसोबत घेण्यात आले. तसेच, या कार्यक्रमात शेतकरी बांधवांना किसनक्राफ्ट फाउंडेशनमार्फत उत्तेजनार्थ बक्षीस वाटप करण्यात आले. प्रथम बक्षीस आशिष भिडे, द्वितीय बक्षीस अनंत पाध्य, तृतीय बक्षीस शांताराम जाधव यांना देण्यात आले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी, शेतकरी बांधव, अभय शेट्ये, किसान क्राफ्टचे स्मित कदम आदि मान्यवर उपस्थित होते.