मोटारसायकलच्या विचित्र अपघातात माकडाचा मृत्यू; दोघे जखमी

। पनवेल । वार्ताहर ।

पळस्पे वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये मुंबई- गोवा हायवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 कर्नाळा अभयारण्य जवळ गोव्याला जाणाऱ्या लेनवर काळ्या रंगाची होंडा कंपनीची यूनिकॉन दुचाकी जात असताना अचानक दुचाकी समोर अभयारण्यातील माकड आडवे आले. हे माकड दुचाकीमध्ये अडकून दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर पडून अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील चालक किरकोळ जखमी झाला आहे व पाठीमागे बसलेला युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या अंमलदार यांनी या ठिकाणी ॲम्बुलन्स बोलावून जखमींना गांधी हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आले. या अपघातामध्ये माकडाचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version