| मुंबई | वार्ताहर |
राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र होतं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही पावसाने दडी मारली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून सकाळपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. कोकणसह पश्चिम किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून काही भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे.