218 कोटीहून अधिक अमली पदार्थांचा साठा सापडला

खालापूरमधील होनाड गावानजीक गोडावूनमध्ये लपवलेला

। खोपोली । प्रतिनिधी ।

खोपोली परिसरातील ढेकू गावात बंद कारखान्यावर छापा टाकून 106 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. अधिक तपासात खालापूर मधील होनाड गावाजवळ असलेल्या गोडावूनमध्ये लपवलेला 218 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा साठा सापडल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

कल्याण येथील कमल जैसवानी, संभाजीनगरमधील मतीन बाबू शेख, ठाण्यातील अ‍ॅथोनी करीकुटटीकरण या तिघांना अटक करण्यात आली. पोलीस दणका मिळाल्यावर यातील अँथोनी बोलू लागला. एमडी पावडर हे अमली पदार्थ होनाड गावाजवळील गोडावून मध्ये लपवून ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी रविवारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी 174 किलो वजनाचा अमली पदार्थाचा साठा त्या ठिकाणी सापडला. यातील अमली पदार्थ विदेशात देखील पाठवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कोकण परिक्षेत्र अधिकारी प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माहिती दिली.

Exit mobile version