केडीएमसीतील ५५ हून अधिक नगरसेवक शिंदे गटात!

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिंदे गटात अनेक आमदार सामील झाले आहेत. शिवाय अजून काही खासदार आमच्या संपर्कात असून ते देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि भाजपने शिंदे यांना दिलेलं मुख्यमंत्रीपदामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. ठाण्यातील शिवसेनेचे ६६ नगरसेवक तर नवी मुंबईतील शिवसेनेचे ३० नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ५५ पेक्षा जास्त नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

नवी मुंबईतील जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात
नवी मुंबईतील जवळपास ३० नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत असून हे नगरसेवक आज रात्री मुंबईत घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. या नगरसेवकांमध्ये ऐरोली विधानसभेतील २० आणि बेलापूर विधानसभेतील १० असे एकूण 30 नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही शिवसेनेला पडणार खिंडार पडणार असल्याचं बोललं जात आहे.

Exit mobile version