उर्दू शिक्षणाचा खेळखंडोबा

जिल्ह्यातील बहुतांश उर्दू शाळांमध्ये शिक्षक नाहीत; राष्ट्रवादीचे आमिर खानजादा यांची माहिती
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा खेळखंडोबा झाला आहे. उर्दु शाळांमध्ये युद्धपातळीवर शिक्षक नियुक्त करावेत, अशा मागणीचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे कार्याध्यक्ष अमीर खानजादा यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून उर्दू शाळांतून हीच परिस्थिती असून, पालकांमूधन संतप्त व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शहरी आणि ग्रामीण भागातील उर्दू शाळांतून शेकडो सामान्य, गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शिक्षक नसल्याने शिक्षणाचे बारा वाजले आहेत.दिवाळी सुट्टीनंतर दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले असूनही अद्याप शिक्षक उपलब्ध झालेले नसून, सर्वत्र नियोजनशून्य प्रकार शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहे. शासनाने शिक्षणाचा हा खेळखंडोबा थांबवावा, अशी मागणी अमीर खानजादा यांनी केली आहे.

Exit mobile version