| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये एकूण 4 बळी घेतल्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 150 बळी पूर्ण केले. या छोट्या फॉरमॅटमध्ये 150 बळी घेणारा साऊदी जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये साऊदीने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, अब्बास आफ्रिदी आणि हारिस रौफ या चार फलंदाजांना बाद केले. साऊदीने 4 षटकात 25 धावा देत चार बळी घेतले. तिसऱ्या बळीसह, साऊदीने 150 आंतरराष्ट्रीय टी-20 विकेट्स पूर्ण केल्या आणि हा आकडा गाठणारा पहिला गोलंदाज ठरला. हा त्याचा 118वा टी-20 सामना होता.