रसायनीतील घटना
रसायनी | वार्ताहर |
वावेघर येथील मायलेकाचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुनिता चंद्रकांत पाटील (45) व प्रणय चंद्रकांत पाटील (22) अशी मृतांची नावे आहेत. त्यांना तुराडे गावासमोरील आपटा ते पनवेल रेल्वे ट्रॅकच्या दिशेने जाणार्या रेल्वेची धडक लागून त्यात ते मयत झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झाला असून, याबाबत रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.