। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रोहिदासवाडी परहूर येथे राहणार्या एकाच कुटुंबातील आई व अल्पवयीन दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दि. 10 नोव्हेंबर रोजी बेपत्ता असलेल्या दोन मुलांची आई घरातील कोणालाही पूर्वकल्पना न देता राहत्या घरातून आपल्या दोन मुलांसह निघून गेली आहे. त्यामुळे घडलेली घटना ही नक्की अपहरण आहे, की आणखी काही? याचा अजूनही खुलासा झालेला नाही. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोह/1780 पाटील हे करीत आहे.