| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील कुंभारपाडा, तेलीपाडा व मधीलपाडा ग्रामस्थ मंडळाच्यावतीने केटीएम प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे अजिंक्यपद आई एकविरा ट्रान्सपोर्ट क्रिकेट संघाने पटकाविले. ही क्रिकेट स्पर्धा चिरनेर येथील मातोश्री मैदानावर दि.3 व 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 8 संघानी भाग घेतला होता.
या स्पर्धेत अंतिम सामना आई एकविरा ट्रान्सपोर्ट व वंदन सेवेन स्टार क्रिकेट या संघात रंगला. या अटितटीच्या समान्यात आई एकविरा संघाने केटीएम प्रिमियर लिगचे अंजिक्यपद पटकावले. त्यांना रोख 20 हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात आला. तर, वंदन सेवेन स्टार क्रिकेट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना 15 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या यंग गटातील विवेक हातनोलकर याला मालिकावीर म्हणून, तर फोर्टी प्लस गटातील रुपेश नारंगीकर यालाही मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. तसेच, उत्कृष्ट फलंदाजाचा मानही वंदन सेवन स्टार संघाचा विवेक हातनोलकर याला मिळाला. तर, गोलंदाज म्हणून रुपेश नारंगीकर आणि क्षेत्ररक्षक म्हणून दिनेश मोकल सन्मानाचे मानकरी ठरले.
या क्रिकेट स्पर्धेसाठी उद्योगपती राजेंद्र खारपाटील व सरपंच भास्कर मोकल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तर, अलंकार परदेशी, प्रफुल्ल खारपाटील, पद्माकर फोफेरकर, निकिता नारंगीकर, नीलम चौलकर, सचिन घबाडी, अर्जुन मोकल, पद्माकर मोकल, प्रशांत खारपाटील, राजू चिर्लेकर, समीर डुंगीकर, विकास नारंगीकर, गणेश म्हात्रे, विद्या कारेकर, निनाद खारपाटील, नितीन नारंगीकर, चेतन चौलकर, सुरेश म्हात्रे, नितीन म्हात्रे, संतोष चौलकर, जितेंद्र नारंगीकर व चालक मोकल यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावून स्पर्धेला शोभा आणली.







