| रत्नागिरी | प्रतिनिधी ।
आईनेच आपल्या तान्हुल्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीत घडली आहे. एक वर्षाच्या मुलीच्या तोंडात आईने कापसाचा बोळा कोंबल्याने तिचा घुसमटून मृत्यू झाला. हुरेन असिफ नाईक (1) असे मृत मुलीचे तर शाहीन आसिफ नाईक (35, चिपळूण अलोरे) असे आईचे नाव आहे. शाहीन हिने मुलीच्या तोंडात कापूस कोंबून तिची हत्या केल्याचे बोलले जात आहे. मूळ चिपळूण येथील रहिवासी असलेली ही महिला रत्नागिरीतील पारस नगर येथे वास्तव्यास होती.
धक्कादायक! आईनेच घेतला चिमुकलीचा जीव
