| म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्रोत्सवात शासनाने 18 वर्षांवरील महिला, माता, गरोदरस्त्रियांसाठी आरोग्य तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 26 ते 5 ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान राबविले जात आहे. या अभियानातून आजपर्यंत 300 महिलांची तपासणी करण्यात आली आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, तसेच अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला.
यावेळी डॉ.प्रशांत गायकवाड, श्रीमती कानेकर, ज्योति महाडीक, गीता पाटिल, रीना धनश्रवडे, रवींद्र शिंदे, डॉ गीतांजली हंबीर, डॉ दिपाली सरदार, मंगेश चव्हाण, घरत, सारंगे, श्रीमती खैरे सिस्टर, श्रीमती सातनाक, प्रा.आ. केंद्र मेंदडी डॉ प्रजक्ता पोटे, डॉ चारुशीला गायकवाड, अरुण कोल्हे, वेटकोळी, श्रीमती दिवेकर, ढंगारे,पोटफोडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आणि लाभार्थी महीला वर्ग उपस्थित होता.