किडनी दान करुन दिला पुनर्जन्म
| महाड | प्रतिनिधी |
दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त 33 वर्षीय पुरूषाला त्याच्या आईला किडनी दान केली असून, मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपणाच्या काही दिवसांतच, त्याला ॲटिपिकल हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोम (एएचयूएस) जो एक दुर्मिळ अनुवांशिक विकार आहे ज्यामध्ये मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. मेडिकव्हर हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली टीमने वेळीच निदान आणि प्रगत उपचाराने रुग्णाचा जीव वाचविला.
महाड येथील 33 वर्षीय रुग्ण सूरज पवार 2024 मध्ये जेव्हा मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याला सतत मळमळणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीला फेस येणे आणि केवळ सहा महिन्यांत 14 किलो वजन कमी होणे अशा समस्या सतावत होत्या. कामावर जाणे, कुटुंबासह जेवणे किंवा मित्रांसोबत वेळ घालवणे यासारख्या साध्या दैनंदिन कामांमुळेदेखील त्याला थकवा येत होता.
रुग्णाला तीन वर्षांपासून उच्च रक्तदाबाची समस्या होती तसेच त्याला मूत्रपिंडाच्या आजाराचा कोणताही कौटुंबिक इतिहास नव्हता, धूम्रपान किंवा मद्यपानाचे व्यसन नव्हते आणि हानिकारक औषधांच्या सेवनासारखा कोणताही वैद्यकीय इतिहास नव्हता. तरीही त्याचे मूत्रपिंड निकामी होत राहिले, ज्यामुळे तो डायलिसिसवर अवलंबून राहिला आणि शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाच्या आजाराच्या भावनिक आणि शारीरिक परिणामांशी झुंजत राहिला.
त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी येणारा प्रत्येक दिवस आव्हानात्मक ठरत होता. मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय त्याला जगण्याची एकमेव संधी देत होता. त्याच्या आईने तिचे एक मूत्रपिंड दान करण्यासाठी पुढाकार घेतला. ते एबीओ विसंगत मूत्रपिंड प्रत्यारोपण (रक्तगटाच्या विरुद्ध) होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या 15 दिवस आधी रुग्णाला रितुक्सिमॅब 200 मिलीग्रामचे इंजेक्शन देण्यात आले. एसओपी म्हणून अँटीबॉडी टायटर्सचे निरीक्षण करण्यात आले. 7 एप्रिल 2024 रोजी यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉ. अमर कुलकर्णी (नेफ्रोलॉजिस्ट) म्हणाले, अनुवांशिक चाचणीने रुग्णाला एक दुर्मिळ (एएचयूएस) विकाराचे निदान झाले. ॲटिपिकल हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम ही एक दुर्मिळ स्थिती आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्या रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडाचे नुकसान करते. रुग्णामध्ये प्रत्यारोपणानंतर लगेचच हा दुर्मिळ आजार दिसून आला, ज्यामुळे परिस्थिती खूपच गंभीर झाली. जेव्हा माझी आई माझ्यासाठी किडनी देणार आहे हे कळालं, तेव्हा माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा निर्माण झाला. पण शस्त्रक्रियेनंतर पुन्हा गुंतागुंत सुरू झाली आणि तेव्हा मला खूप भीती वाटू लागली. मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे मला जगण्याची दुसरी संधी मिळाली, असे रुग्ण सूरज पवार याने सांगितले.
