यशस्वी किडनी प्रत्यारोपण
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत शहरातील 14 वर्षीय बालकाचा आणि त्यांचे रक्ताचे नाते असलेली त्याची आई यांचे रक्तगट वेगळे असून देखील डॉ अमित लंगोटे यांच्याकडून यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. नवी मुंबई खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयातल कर्जतच्या युवा तरुणावर यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. विकसित वैद्यकीय उपचारप्रणालीमुळे आता विसंगत रक्तगटातही किडनी प्रत्यारोपण होऊ शकले आहे.
धनराज सेंढरे (14) हा मुलगा किडनी आजाराने त्रस्त होता. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्याची तपासणी जून 2022 मध्ये कर्जत येथे कार्यक्रमासाठी आलेले किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉ. अमित लंगोटे यांनी नवी मुंबई येथील मेडीकव्हर रुग्णालयात पाठविण्यात आले आणि त्यानंतर प्राथमिक उपचार केल्यावर किडनी निकामी झालेली असल्याने किडनी प्रत्यारोपण करावे लागणार होते. त्यासाठी या बालकावर रुग्णालयात सलग सात-आठ महिने डायलिसिसवर ठेवण्यात आले. या मुलाचे वडील नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत होती. अशा सर्व अडचणीच्या परिस्थितीवर मात करताना डॉ लंगोटे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्या बालकाच्या आईने स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या या बालकाच्या आईचा रक्तगट वेगळा असल्याने विज्ञानाचे प्रगतीमुळे वेगवेगळे रक्तगट असताना देखील किडनीदान आणि किडनी प्रत्यारोपण करून 14 वर्षीय बालकाला नवीन आयुष्य मिळाले आहे.
मुलाला किडनीचा आजार असल्याचे निदान झाल्या आम्ही खूप घाबरलो होतो. शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पैसे नसल्याने डॉक्टरांनी आणि रुग्णालयाने आम्हाला सहकार्य केले. रक्तगट वेगळे असल्याने शस्त्रक्रिया करणे अवघड होती, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून मुलाचे प्राण वाचवलेत.
रूग्ण बालकाची आई