। अलिबाग । वार्ताहर ।
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण या कार्यालयामार्फत तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे कामकाज प्रत्येक महिन्यात आयोजित करण्यात येत असते. कोव्हिड काळातील दुसर्या लाटेत वाढती रुग्ण संख्या व शासनाच्या वेळोवेळी आदेशान्वये माहे मार्च 2021 पासून शिबीर कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. आता या शिबीर कार्यालयाचे कामकाज माहे नोव्हेंबर 2021 पासून पूर्ववत सुरू करण्यात येत असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा नोव्हेंबर-2021 महिन्याचा शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे मंगळवार, दि.11 नोव्हेंबर व दि.सोमवार दि.22 नोव्हेंबर रोजी ता. महाड. शुक्रवार, दि.12 नोव्हेंबर रोजी ता.रोहा. गुरुवार, दि.11 नोव्हेंबर रोजी ता.मुरुड. बुधवार दि.24 नोव्हेंबर रोजी ता.माणगाव. बुधवार, दि.10 नोव्हेंबर 2021 व मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी ता.श्रीवर्धन. शुक्रवार, दि.26 नोव्हेंबर रोजी ता.अलिबाग असा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.