| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील जेएनपीटी ते पुणे जाणाऱ्या रोडवर पळस्पे फाटा ब्रिजवर भरधाव मोटार सायकलची ब्रिजच्या कठड्याला धडक बसून अपघात झाला. या अपघातात मोटार सायकलीवरील 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इमरान पठाण, कोळखे पेठ हा पल्सर मोटार सायकल (एमएच-06-बीवाय-8518) हि भरधाव वेगाने चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून पनवेल जवळील जेएनपीटी ते पुणे जाणाऱ्या रोडवर पळस्पे फाटा ब्रिजच्या कठड्याला धडक देऊन अपघात झाला. या अपघातात स्वतः गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या मागे बसलेला विघ्नेश भालेराव याचा सुद्धा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पनवेल पोलिस करीत आहेत.