कृषी पर्यटन विकास संस्थेची मोटरसायकल रॅली

| अलिबाग | वार्ताहर |

पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष 2023 ची जागतिक थीम आहे. या थीमला अनुसरून बुधवारी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेने पर्यटनविषयक जागृती करण्यासाठी मांडवा जेट्टी ते अलिबाग समुद्र किनारा मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. तिचा समारोप अलिबाग येथे करण्यात आला.

अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेची ही मोटरसायकल रॅली सकाळी 8.30 ते 11.30 दरम्यान मांडवा जेट्टी, धोकवडे, सासवणे, आवास, किहीम, थळ, बुरुमखाण, वरसोलीमार्गे अलिबाग अशी काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये 20 मोटरसायकलस्वार सहभागी झाले होते. पर्यटन व्यावसायिक पर्यटनवृद्धीबाबतच्या घोषणा देत होते. या रॅलीत अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज घरत, उपाध्यक्ष राजाराम पडवळ, सचिव बी.एन. कोळी, खजिनदार अमिष शिरगावकर, माजी अध्यक्ष सुबोध राऊत, ॲड. शेखर पांडव, गणेश पुरो, आल्हाद जाधव, बाबूशेट राणे, संदीप माळी, निमिष परब, नितीन घरत, उमेश म्हात्रे, आशिष शिरगावकर, विश्वजीत जोगळेकर अन्य सदस्यांचा उस्फूर्त सहभाग होता.

Exit mobile version