| म्हसळा | वार्ताहर |
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृती मोटारसायलक रॅली प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा येथे काढण्यात आली. 18 वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन प्रांत महेश पाटील यांनी केले. सईद अहमद कादिरी यांच्या हिंदुस्थान पेट्रोलिम पंपापासून या बाईक रॅलीला सुरुवात झाली.
याप्रसंगी प्रांत महेश पाटील यांच्यासमवेत तहसीलदार समीर घारे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, महसूल तहसीलदार धर्मराज पाटील, श्रीवर्धन नायब तहसीलदार केमनाईक, निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे, सईद अहमद कादिरी, मंडळ अधिकारी सलीम शहा, म्हसळा तलाठी गोरख माने, तालुक्यातील तलाठी, महसूल कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पेट्रोल भरावयास येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न प्रांत महेश पाटील यांनी करून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून 85 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान करून म्हसळा तालुक्याने रेकॉर्ड ब्रेक करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.