| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहराजवळील कळंबोली जेएनपीटी हायवे वर करंजाडे एक्झिट पॉइंटवर एका मोटरसायकलीस अज्ञात वाहनाची ठोकर बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनय सोनवणे (30) रा. खारघर हा त्याच्या ताब्यातील होंडा एक्सपल 200 मोटारसायकलने जात असताना पनवेल शहराजवळील कळंबोली जेएनपीटी हायवेवर करंजाडे एक्झिट पॉइंटवर अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, बेदरकारपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून विनय सोनवणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वारा विनय सोनवणे यांचा मृत्यू झाला असून, या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.






