। पनवेल । वार्ताहार ।
पनवेल शहर परिसरातून दोन विविध ठिकाणी मोटारसायकलींची चोरी झाल्याची घटना घडली असून, यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटी येथील यशकमल सोसायटीमध्ये राहणारे संकेत राणे यांनी त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंग परिसरात उभी करून ठेवलेली 70 हजार रुपये किमतीची काळ्या व ग्रे रंगाची एमएच 46 एवाय 9150 क्रमांकाची बजाज पल्सर एन एस 200 मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तसेच दुसऱ्या घटनेत विचुंबे येथे राहणारे नवनाथ सोनावणे यांनी त्यांची निळ्या व सिल्वर रंगाची एमएच 46 एएम 3328 क्रमांकाची 15 हजार रुपये किमतीची डिस्कव्हर एम 125 मोटारसायकल पनवेल रेल्वे स्थानका बाहेरील साईमंदिरा जवळ मोकळ्या जागेत पार्किंग करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या दोन्ही घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पनवेल शहर परिसरातून मोटारसायकलींची चोरी
