अलिबाग पेट्रोल पंपावर वाहनधारकांची तोबा गर्दी

| अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

सरकारने हिट अँड रन बाबत नवीन कायदा केला आहे. या कायद्यामुळे वाहतूकदार व्यवसायिकांना फटाका बसणार असून या कायद्याला व्यवसायिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे वाहतूकदार संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. तसाच वाहन चालकांनाही फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. संप सुरू झाल्यानंतर पेट्रोल टंचाई सुरू होईल अशी बोंब झाल्याने सोमवारी सायंकाळ पासून अलिबाग मधील पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

अलिबागमध्ये एच.पी., भारत पेट्रोलियम, रिलायन्स, इंडियन ऑईल असे पेट्रोल पंप आहेत. पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी दि.01 रोजी सायंकाळ पासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती. आजही दि.02 रोजी तिच परिस्थिती आहे. सकाळपासून पेट्रोल पंपावर वाहन चालकांची रीघ लागली होती. शहरातील चारही पंपावर पेट्रोल संपले आहे. त्यामुळे शहरात आता पेट्रोलचा खणखणाट झाला आहे. पेट्रोल संपल्याने चालकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे संप कधी संपणार याकडे वाहन चालकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version