। सांगली । प्रतिनिधी ।
कुस्ती क्षेत्राला हादरवणारी एक बातमी समोर आली आहे. सांगलीतील कुस्तीपटू सूरज निकम याने आत्महत्या केली आहे. युवा पैलवान सूरज निकम हा सांगलीतील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील निवासी होता. सूरज निकम याने कुस्ती क्षेत्रात चांगली कामगिरी करुन आपली एक ओळख निर्माण केली होती. सूरज निकम याने अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात आपली जागा आणि ओळख निर्माण केली होती. सूरजने कुमार महाराष्ट्र केसरीची गदासुद्धा पटकावली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज निकम याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास त्याने घरात आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.