खड्ड्यात मेणबत्या लावून आंदोलन

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
दिवाळीच्या सणामध्ये एका ठेकेदाराने खासगी केबलसाठी रस्त्यात खोदकाम करून अपघाताला आमंत्रण देण्याचे काम केले आहे. याकडे पालिका सत्ताधार्‍यांचा पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधण्यासाठी सालईवाडा येथे खड्ड्यात मेणबत्या लावून अनोख्या प्रकारचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यावेळी हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, संतोष जोईल, देवा टेमकर, बावतीस फर्नांडिस, असलम खतीब, दर्शना बाबर-देसाई, नझीर शेख, जहिरा ख्वाजा आदी उपस्थित होते. याप्रसंगी, शिरोडा नाका परिसरात खड्डे बुजवण्याचे सुरू असलेले काम रोखत प्रथम रहदारीच्या ठिकाणचे रस्ते सुशिस्थित करा, अशी मागणी करण्यात आली.

Exit mobile version