प्राथमिक शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
राज्यभर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितद्वारे धरणे आंदोलन करीत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या निराकरणासाठी निदर्शने करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने धरणे आंदोलन करीत एकूण 16 मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेले हे आंदोलन दुपारपर्यंत सुरू होते. विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्‍नांसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व मागण्या मंजूर करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, आयुक्त, संचालक आदींना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले.

Exit mobile version