एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2022 मध्ये घेण्यात येणार्‍या अंदाजित स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल, अशी माहिती एमपीएससीप्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे 2022 मधील स्पर्धा परीक्षा होतील की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने यंदा पदभरती होणार नाही किंवा पुढे ढकलण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, एमपीएससीने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून परीक्षा होतील, असे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version