पुणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी 2 जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. 2 जानेवारी रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना काळात परीक्षा न झाल्याने वाढीव सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने पत्रकात म्हटले आहे. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, 1 मार्च, 2020 ते 17 डिेसेंबर 2021 कालावधीत वयोमर्यादा ओलांडली त्या उमेदवारांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे होणार्या परीक्षेसाठी 28 डिसेंबर 2021 ते 1 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी 1 जानेवारी रात्री 11. 59 पर्यंत अर्ज करता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरून कार्यालीयन वेळेत रक्कम भरायची आहे.