। अलिबाग । प्रतिनिधी ।
तेलंगणा, खम्माम येथे झालेल्या 13व्या मिस्टर इंडिया 2021 या स्पर्धेत अलिबागच्या डिवाईन एनर्जी जिमचा खेळाडू आचल कडवे यांनी फिटनेस फिजिक्स या कॅटेगरी मध्ये गोल्ड मेडल मिळविले.
या स्पर्धेत डिवाईन एनर्जी जिमचा अजून एक खेळाडू संजय ऊले यांनी 85 किलो वजन गटात बॉडी बिल्डिंग या प्रकारात 5 वा क्रमांक पटकावला. या गटामध्ये भारतातील विविध राज्यांतील टॉप 32 स्पर्धकांना सहभाग घेतल्यामुळे या गटात जोरदार फाईट झाली. दोन्हीं खेळाडूंना डिवाईन एनर्जी जिमचे डायरेक्टर व महाराष्ट्र टीम कोच सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व कोकण बॉडिबिल्डींग फिजिक्स स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अँड किरण कोसमकर यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच प्रफुल्ल पाटील यांचे अभिनंदन त्यांनी आलिबाग येथे हा खेळ वाढविण्यासाठी सचिन पाटील यांना वेळोवेळी मदत करत खेळाडूंना प्रोत्साहन देऊन खेळाडूंचे मनोबल वाढवत हा खेळ वाढवला. या दोन्ही खेळाडूंचं कोकण बॉडिबिल्डींग फिजिक्स स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन अलिबाग यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.