आशाताई शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा

। कंधार । प्रतिनिधी ।

लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.20 रोजी लोहा कंधार मतदारसंघात विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमासह धार्मिक कार्यक्रम राबवून आशाताई शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा केला. आमदार शिंदे यांच्या नांदेड येथील निवासस्थानाहुन कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मोठा ताफा निघून सकाळी नांदेड शहरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना आशाताई यांनी अभिवादन केले. यानंतर ढवळे कॉर्नर किवळा उस्माननगर, पांगरा, कंधार बहादरपुरा व लोहा शहरात महामानवांच्या पुतळ्याला आशाताईंनी अभिवादन केले. मतदार संघात विविध ठिकाणी क्रेनच्या साह्याने आशाताई यांना मोठमोठे हार व फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी आशाताईंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.



विकी गार्डन मंगल कार्यालय पारडी येथे आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याला शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष भाई आमदार जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्राताई पाटील, प्रसिद्ध उद्योजक रेड्डी, नांदेड महानगरपालिकेच्या महापौर जयश्रीताई पावडे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, खरेदी विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर, कंधार बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, उपसभापती श्याम अण्णा पवार, शेकाप ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसातकर यासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते हितचिंतक यांनी आशाताईंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी विकी मंगल कार्यालयामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह .भ. प अक्रूर महाराज बिड यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साधू संतांचा व वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने भावीक भक्त, महाराज मंडळी, भजनी मंडळी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.

Exit mobile version