पहिल्याच पावसात रायगडात महावितरण नापास

। रायगड । प्रतिनिधी ।
पहिल्याच पावसाने रायगडात सर्वत्र दमदार सुरुवात केली. मात्र कोसळणार्‍या पावसाच्या सरीत विद्युतपुरवठा मात्र सातत्याने खनदीत होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने अनेकांना रात्र अंधारात चाचपडत जागून काढावी लागली आहे.

श्रीवर्धन तालुक्यात 18 तास लाईट बंद
तालुक्यातील पहिल्याच मुसळधार पावसाने व विजांच्या कडकडाटाने 16 तास वीज पुरवठा खंडीत झाला. सात जुन रोजी पावसाने रिमझीम पडून हजेरी लावली व तीन दिवसांच्या विश्रांती नंतर दहा तारखेला मध्यरात्री गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे पाभरा येथून श्रीवर्धन सबस्टेशनला येणार्या मुख्यवाहिनी वरून वीजेचा झोत गेल्यामुळे दहा इन्सुलेटर निकामी झाले.पाभरा ते श्रीवर्धन मार्गावर बहुतेक ठिकाणी बिघाड झाल्याने दुरूस्तीचे काम सुरू होते. तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आठवड्यातून दोन वार पोल, ट्रान्सफार्मर, वायर्स तसेच इतर देखभाल व दुरूस्ती साठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत केला जातो तसेच एखाद दिवसाआड काहीना काही कारणांनी वीज पुरवठा खंडीत होतो. असे असुन सुद्धा वीज देयकामधे कायम वाढ होत आहे. पहिल्या पावसाने महावितरण सेवेची हि अवस्था झाली तर सप्टेंबर महिन्या पर्यंत महावितरण ग्राहकांना अजून किती झटके मिळणार आहेत.श्रीवर्धन महावितरण कार्यालयात प्रभारी उप अभियंता म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आली आहे तेच कायम संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यामुळे ग्राहकांनी आपल्या व्यथा मांडायच्या कुठे असा प्रश्‍न उपस्थि

महावितरणच्या दुर्लक्षामुळे 12 गावे तीन दिवस अंधारात
रोहा तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील असलेली गावे गोपाळवट , फणसवाडी, वाघीरपट्टी, मसाडी, कांटी, केळघर, वांडरखोंडा, साटलेवाडी , आराळी, खडकी, वांदरखोंड असी सुमारे दहा ते बारा गावांचा विज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाल्याने वीज ग्राहक पुरते हैरान झाले आहेत. दरवर्षी रोहा महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारे अनेक दिवस वीज प्रवाह खंडित होत असतो असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. गुरुवारी या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला असुन गेले अठ्ठेचाळीस तास उलटून गेले तरी विज प्रवाह सुरू झाला नसल्याने या गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. अनेक वेळा रोहा महावितरणच्या कर्मचार्‍यांना फोन केला असता एक तासात दोन तासात लाईट येईल असे सांगत असून अठ्ठेचाळीस तास ऊलटून गेले तरी विजेचा पत्ता नाही. अशी माहिती फणसवाडीचे ग्रामस्थ गोविंद हिरवे यांनी दिली. ही गावे दुर्गम डोंगर भागात वसलेली असल्याने महावितरण या गावांच्या वीज पुरवठा कडे नेहमीच दक्ष करीत असल्याने गावांतील ग्रामस्थांना नेहमीच अंधारात रहावे लागते. तरी या कडे तातडीने लक्ष देऊन या ठिकाणच्या गावांचा नेहमीच वीज पुरवठा खंडीत होत असलेला सुरळीत करावा अशी या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे.

उरणध्ये पहिल्या पावसात बत्ती गुल; विद्युत तार तुटली
पहिल्या पावसाने उरण तालुक्यात शुक्रवारच्या रात्रीच्या सुमारास दमदार सुरुवात केली. मात्र कोसळणार्‍या पावसाच्या सरीत विद्युतपुरवठा करणारी तार तुटून पडल्याची घटना भेंडखळ गावाजवळ घडली. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने अनेकांना रात्र अंधारात चाचपडत जागून काढावी लागली आहे. उरण तालुक्यात शुक्रवारच्या रात्रीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली.त्यामूळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र कोसळणार्‍या पावसाच्या सरीत ग्रामीण भागातील गावांना विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडल्याची दुदैवी घटना भेंडखळ गावाजवळ घडली.त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. एकंदरी पावसाने दिलासा दिला असला तरी महावितरणच्या गलथान कारभारामुळे रहिवाशांना अंधारात चाचपडत रात्र जागून काढावी लागली आहे.त्यातच तालूक्यातील अनेक रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. सदर पाऊस हा पेरणी पुरक नसल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी आप आपल्या शेतात भात बियाणे पेरणी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

तळा तालुका अंंधारात
पावसाळा सुरुवात होताच तळा तालुक्यातील वीज गायब होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दरवर्षी पावसाच्या अगमनापासूनच तळा तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू होतो.आणि एकदा गेलेली वीज जवळजवळ 4 ते 5 तास येत नाही यामुळे विजेअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते. पावसाळा सुरू व्हायच्या आधी महावितरण विभागाने झाडे तोडणे, बॉक्स मेंटेनन्स, ब्रेकर मेंटेनन्स, जिओडी मेंटेनन्स, जीर्ण खांब बदलणे यांसारखी पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे वेळीच पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना देखील महावितरण विभागाची ही कामे पूर्ण झाली नव्हती परिणामी जराजरी ढगांचा गडगडाट अथवा रिमझिम पावसाला सुरुवात होताच महावितरण विभागाकडून तळा तालुक्याची बत्ती गुल करण्यात येते. यामुळे पावसाळ्यात जरी नागरिकांना थंडावा जाणवत असला तरी लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांना रात्रभर मच्छरांचा सामना करावा लागतो. काहीवेळा मुसळधार पावसामुळे संपूर्ण दिवसभर देखील तालुक्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो व याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून वीजबिल वसुलीसाठी महावितरण जेवढ्या तत्परतेने मेहनत घेते ती मेहनत पावसाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी का घेत नाही असा प्रश्‍न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version