थकीत ग्राहकांची वीज तोडणी हाच अंतिम पर्याय
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील 5073 वीज ग्राहकांनी महावितरणचे तब्बल रुपये 4 कोटी 52 लाख 47 हजार थकविले असून, वसुलीसाठी यापुढे कोणतीही सवलत दिली जाणार नाही,जे थकबाकीदार आहेत त्यांचा वीज पुरवठा तातडीने तोडण्याचा इशारा महावितरणचे म्हसळा उपविभागीय उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यानी दिला आहे.
तालुक्यातील आंबेत, खामगाव, मेंदडी, म्हसळा शहर (1)आणि म्हसळा 2 या विभागातील 5776 ग्राहकांनी साडेचार कोटी थकविले आहेत.यामध्ये घरगुती,व्यावसायिक, औद्योगिक,सरकारी कार्यालये, शेती, पथदिवे, नळ पाणी पुरवठा आणि इतर ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यात घरगुती वापराचे 4 हजार 256 ग्राहकांकडे 51 लाख 54हजार,व्यावसायिक (वाणिज्य) वापराचे 390 ग्राहकांकडे 10लाख 77हजार,औद्योगिक वापराचे 46 ग्राहकांकडे 2 लाख 32 हजार, ,शेती वापराचे 59 ग्राहकांकडे 54 हजार, पथदिवे वापराचे 131 ग्राहकांकडे 3 कोटी 73लाख 11 हजार, नळ पाणी पुरवठाचे 62 ग्राहकांकडे रुपये 8लक्ष 11 हजार रुपये.आणि 113 शासकीय आणि निम शासकिय वापराचे ग्राहकांकडे 4लक्ष 56 हजार थकबाकी आहे.
म्हसळा महावितरणकडून दररोज 100 हून अधिक थकित वीज कनेक्शन कापण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती आहे. 2019 व कोरोना काळात म्हणजे एप्रिल 2020 पासून वीज बिल न भरणार्या तसेच कोरोना काळात या ग्राहकांना वीज बिलात सूट देण्यात आली होती आशा थकीत सर्व ग्राहकां वर आता कारवाईचा कडक बडगा उचलला जाणार आहे.
विविध विभागांची ही आकडेवारी हजारो कोटीत जाऊन पोहचली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकीत धारकांची वीज तोडणी करण्याचे आदेश दिले. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे.
प्रदीप पटवारी,उप-कार्यकारी अभियंता
महावितरण म्हसळा.
15 व्या वित्त आयोगातील निधीतून पथदिवे आणि पाणीपुरवठा विज देयके आदा करण्या बाबत ग्रामविकास विभागामार्फत पत्र आले आहे
सुनिल गायकवाड, विस्तार अधिकारी