मोबाईल अ‍ॅपवरुन समजणार लालपरीचा ठावठिकाणा

रायगडमध्ये लवकरच कार्यान्वित
अलिबाग । वर्षा मेहता ।
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात धावणार्‍या एसटी अर्थात लालपरीचा ठावठिकाणा आता मोबाईलवरुनच प्रवाशांना लागणार आहे.यासाठी एसटी महामंडळाने एक अ‍ॅप विकसित केले असून,त्याद्वारे एसटीची खडानखडा माहिती प्राप्त होणार आहे.या अ‍ॅपची सुविधा लवकरच रायगडच्या प्रवाशांना उपलब्ध केली जाणार आहे.
एसटी महामंडळाने एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन – एमएसआरटीसी कम्प्युटर अ‍ॅप सादर केले आहे. त्याद्वारे प्रवाशांना रस्त्यावर बसेसचे थेट स्थान दर्शवते. या तंत्रज्ञानात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) वापरण्यात आली आहे. व्हीटीएससाठी अर्ज केवळ नाशिक विभागातील बस आणि मुंबई आणि पुणे दरम्यान धावणार्‍या शिवनेरी बसमध्ये सक्रिय करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत उर्वरित बसेसमध्ये ती कार्यान्वित केली जाईल अशी माहिती एमएसआरटीसी अ‍ॅपवर देण्यात आली आहे.
या अ‍ॅप्लिकेशनमुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर बसची थेट ठिकाणे तसेच जवळचे बसस्थानक, बस डेपो आणि मार्गांसारखी माहिती पाहण्यास सुविधा उपलब्द होणार आहेत. त्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी एसओएस सेवा देखील असेल.
रायगडमध्ये पण हे अ‍ॅप लवकरात लवकर सुरु करायच आपला प्रयत्न असून,सध्या त्याची प्रक्रियाही सुरु आहे.एसटीचे सध्या ऑनलाईन रिझरव्हेशन अ‍ॅप सुरुच आहे.जिथे पायलट प्रोजेक्ट सुरु आहे त्या नाशिक, पुणे विभागाला काही तांत्रिक अडचणी आहेत का? जर ते कुठल्याही तांत्रिक अडचणीं शिवाय यशस्वी झाले तर आपल्या कडे पण सुरु होतील.
अनघा बारटक्के,विभाग नियंत्रक

आपल्या बसचा मागोवा घ्या-
हे अ‍ॅप प्रवाशांना निर्दिष्ट मार्गावर चालणार्‍या MSRTC बसचा मागोवा घेण्यास मदत करते, फक्त बुक केलेल्या तिकिटावर प्रदान केलेला बस क्रमांक प्रविष्ट करा आणि बस ऑन मॅप बटणावर क्लिक करा, चालू बसचे वर्तमान स्थान थेट नकाशावर दर्शविले जाईल. त्याच्या मार्ग माहितीसह, शिवाय हे आपल्या मित्र -नातेवाईकांसह प्रवासाचा मागोवा घेण्यासाठी सामायिक केले जाऊ शकते.

Exit mobile version