। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील मुठवली खु.येथील रहिवासी असणारे मुकेश शिंदे यांचे दि. 30 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी दु:खद निधन झाले.
मुकेश यांच्या अल्पवयीन निधनाने समस्त शिंदे परिवारासह मुठवली गावावर शोककळा पसरली असून सा-या पंचक्रोशीतही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहिण, पुतणे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्रवारी (दि.8) तर अंतिम धार्मिकविधी रविवारी (दि.10) राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.