मुक्ता खटावकर यांचा गौरव

| पनवेल | प्रतिनिधी |

रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका मुक्ता भानुदास खटावकर यांनी श्रीलंकेत आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्वालिटी एज्युकेशन 2025 या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेमध्ये स्कूल प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. ही परिषद श्रीलंकेतील उवा प्रांतात दि. 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पार पडली. या परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता, पाठ्यक्रम विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, शाळांमधील नेतृत्व विकास, आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे शिक्षण क्षेत्रातील क्रांती, तसेच विविध शैक्षणिक धोरणांवर सखोल चर्चा झाली. या परिषदेत सुमारे 120 मुख्याध्यापक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून 19 मुख्याध्यापकांना सहभागाची संधी लाभली. त्यात मुक्ता खटावकर यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. त्यांनी टेकनॉलिजिकल पेडागॉजिकल कन्टेन्ट नॉलेज या विषयावर सादरीकरण करून तांत्रिक शैक्षणिक सामग्री ज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या या सादरीकरणाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. परिषदेच्या समारोप प्रसंगी उवा प्रांताचे राज्यपाल जे.एम. कपिला जयसेखरा यांच्या यांच्यामार्फत चीफ सेक्रेटरी ऑफ उवा प्रांत यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

Exit mobile version