। मुंबई । वार्ताहर ।
ओम साईश्वर सेवा मंडळ आयोजित पुरुष व महिला मुंबई जिल्हा खो-खो निवड चाचणी स्पर्धा मनोरंजन मैदान, पेरू चौक, लालबाग, मुंबई येथील क्रीडांगणात सुरू आहे. रविवारी झालेले महिलांचे दोन्ही फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय कोणता लागेल हे समाझत नव्हते. प्रेक्षकांचे डोळे सामन्यावर शेवट पर्यंत खिळून होते. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात माहिमच्या सरस्वती कन्या संघाने लालबागच्या ओम साईश्वर सेवा मंडळाचा पराभव केला.
महिलांच्या उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्यात दादरच्या शिवनेरी सेवा मंडळाने दादरच्याच अमर हिंद मंडळाचा पराभव केला. तर पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने अमर हिंद मंडळाचा पराभव केला. पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या दुसर्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम समर्थ भा. व्यायाम मंदिर या संघाचा पराभव केला.