मुंबई-गोवा महामार्ग धुळीच्या सावटाखाली

सुकेळी | वार्ताहर |
यावर्षीच्या पडलेल्या समाधानकारक पावसाने दोन ते तीन दिवसांपासून उघाड टाकल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व पायी चालत जाणा-यांना मोठ्या प्रमाणात या धुळीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु असतानाच यावर्षीच्या पहिल्या पावसातच महामार्गावर महाभयंकर खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या पडलेल्या खड्डयांमध्ये संबंधित ठेकेदाराकडुन निकृष्ट दर्जाची खडी व माती वापरुन खड्डे भरण्यात आले होते. परंतु मध्यंतरी पडलेल्या जोरदार पावसामुळे व अतिवेगाने जाणा-या वाहनांमुळे या खड्डयांमधिल खडी व माती रस्त्यावर आजुबाजुला पसरली आहे. त्यामुळे गेले दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्गावर नागोठणे ते कोलाड दरम्यानच्या रस्त्यावर धुळीचे लोटच्या लोट दिसत आहेत.तात्पूरत्या स्वरुपात बुजवण्यात आलेल्या खड्डयांमधिल खडी व माती रस्त्यावरच पसरल्यामुळे अतिवेगाने येणार्‍या जाणार्‍या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडाल्यामुळे दुचाकीस्वार व पादचारी यांच्या डोळ्यात मोठ्या प्रमाणात धुळ गेल्यामुळे त्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे याच धुळीमुळे दुचाकीस्वारांचे कपडे देखिल मोठ्या प्रमाणात धुळ बसुन खराब होत आहेत. त्यामुळे पाऊस नसतांना देखिल दुचाकीस्वारांना रेनकोटचा वापर करावा लागत आहे.

Exit mobile version