मुंबई मजबूत स्थितीत; मुशीर खानचे द्विशतक

| मुंबई | वृत्तसंस्था |

रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्य पूर्व फेरीत मुंबईकडून खेळणाऱ्या 18 वर्षाच्या मुशीर खानने बडोदा विरूद्ध 203 धावांची नाबाद शतकी खेळी केली. मुशीने 357 चेंडूत 18 चौकार मारत ही खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 384 धावा केल्या आहेत. मुशीर नुकत्याच झालेल्या 19 वर्षा खालील भारतीय संघात देखील होता. त्याने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये दोन शतकी खेळी केल्या. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

मुशीर आपल्या कारकिर्दीतील चौथाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळत आहे. त्यात त्याने शतक नाही तर थेट द्विशतक ठोकले. मुंबईकडून त्याला तीन रणजी ट्रॉफी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात त्याने फक्त 96 धावा केल्या होत्या. मात्र त्याने बाद फेरीत संघाचा निम्मा संघ 145 धावात गारद झाल्यानंतर त्याने डाव सावरत द्विशतकी खेळी केली.

Exit mobile version