सलग पराभवाने मुंबई इंडियन्सचा रस्ता खडतर

| मुंबई | प्रतिनिधी |
अयपीएलचा 5 वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सची ह्या हंगामात सुरूवात खूपच खराब झाली. मुंबई इंडियन्सला 5 पैकी 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. स्पर्धेत टिकण्यासाठी मुंबई इंडियन्सला आता नऊपैकी आठ सामने जिंकावे लागतील. बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सला सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पंजाबने मुंबईला 199 धावांचे लक्ष्य दिले होते, पण ते ते गाठू शकले नाही आणि सामना 12 धावांनी गमावला. : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला अजूनही विजय मिळवता आलेला नाही. यंदाच्या हंगामात पाच सामने खेळून पाचही सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला. बुधवारी मुंबई इंडियन्स विरूध्द पंजाब किंग्ज यांच्यात सामना झाला. पंजाबने मुंबईला 199 धावांचे लक्ष्य दिले होते, पण ते ते गाठू शकले नाही आणि सामना 12 धावांनी गमावला. आता स्पर्धेत आपले अस्तिव टिकवण्यासाठी मुंबई इंडियन्सला उरलेल्या नऊपैकी आठ सामने जिंकावे लागतील.

रोहितचे लाखोंचे नुकसान
पराभवानंतर मुंबई इंडियन्स आणि कर्णधार रोहित शर्मा यांचे आर्थिक नुकसान झाले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सच्या उर्वरित खेळाडूंना 6 लाख किंवा 25 टक्के मॅच फी दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा ताण
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल करंडक जिंकण्याची करामत करून दाखवली. मात्र यंदा त्यांची गाडी घसरली आहे. याप्रसंगी दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने, रोहित सध्या कसोटी, एकदिवसीय तसेच टी-20 या भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचा मानसिक ताण रोहितवर आला असून याचे पडसाद आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना दिसून येत आहेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले. रोहित सलामीला फलंदाजीला येतो. ज्या लढतींत तो धावा करतो, त्या लढतींमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ जिंकतो. मात्र भारतीय वन डे व टी-20 संघाचे पूर्ण वेळ नेतृत्व मिळाल्यानंतर तो पहिल्यांदाच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत आहे. त्यामुळे त्याच्यावर दबाव येत तर नाही ना, याचा विचार करावा लागणार आहे, असेही स्मिथ म्हणाला.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणुन ओळखला जातो. विराट कोहलीला रन मशीन असा दर्जा देण्यात आला आहे. त्याच बरोबर त्याच्या नावावर अनेक विक्रम देखील आहेत. यामुळेच प्रत्येक खेळाडू त्याच्याकडून प्रेरणा घेत असतो. मग तो भारताचा खेळाडू असो किंवा इतर कोणत्याही देशाचा तो कायम फेवरेट असतो.

लंकेचा धनंजय डी सिल्वा हा देखील विराट कोहलीचा चाहता आहे. विशेष म्हणजे त्याला किंग कोहलीनी खास गिफ्ट दिले आहे. धनंजय डी सिल्वाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहलीच्या टेस्ट टी-शर्टवर धनंजय डी सिल्वाची सही आहे. धनंजय डी सिल्वाने पोस्टमध्ये लिहिले आहे. तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण करण्यात कधीही मागे हटू नका. जिथे प्रेम असते तिथे प्रेरणा असते. तेव्हा तुम्ही चुकीचे असू शकता असे मला वाटत नाही. विराट या भेटवस्तूसाठी खूप खूप धन्यवाद. तुम्ही क्रिकेटचे सर्वोत्तम राजदूत आहात. अशाच अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहा. धनंजय डी सिल्वाची हि पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

Exit mobile version