मुंबईला गेम चेंजरची उणीव

। मुंबई । प्रतिनिधी ।

आयपीएल 2024 च्या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सला सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत. मुंबई इंडियन्सच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलताना गावसक म्हणाले, ‘मुंबई इंडियन्सला नक्कीच सूर्यकुमार यादवची उणीव भासत आहे. सूर्यकुमार तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि तो खूप चांगल्या प्रकारे पलटवार करु शकतो, परंतु तो यावेळी उपलब्ध नाही. मुंबई इंडियन्सची टीम अपेक्षा आणि प्रार्थना करत असेल की तो लवकर बरा होऊन खेळण्यासाठी उपलब्ध व्हावा. कारण तो सामन्यात मोठा फरक निर्माण करू शकतो. तो एक गेम चेंजर आहे.

Exit mobile version