राज्यस्तरीय वूडबॉल स्पर्धेत मुंबई महिला संघ विजेता

रायगडचा पुरुष संघ उपविजेता
। मुंबई । वार्ताहर ।
16 व्या राज्यस्तरीय वूडबॉल अजिंक्यपद स्पर्धेत स्ट्रोक प्रकारात मुंबई विभागाची चमकदार कामगिरी केली असून रायगडचा पुरुष संघ उपविजेता तर मुंबईचा महिला संघ विजेता ठरला. महाराष्ट्र वूडबॉल असोसिएशनच्या मान्यतेने नागपूर वूडबॉल असोसिएशनच्या वतीने पारशिवनी येथील महात्मा गांधी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात तीन दिवसांची स्पर्धा पार पाडली. उपविजेत्या रायगड पुरुष संघातून केतन गायकवाड, सोहम कनगुटकर, सूरज तळेकर, आकाश येवले यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले तर विजेत्या मुंबई महिला संघासाठी सोनाली मालुसरे, छाया म्हात्रे, संजना होळकर, चैताली नाटेकर यांनी योगदान दिले. स्ट्रोक एकेरी प्रकारात पुरुष गटात हेमंत पयेर याने कांस्य तर महिला एकेरी प्रकारात सोनाली मालुसरे हिने रौप्य पदक पटकावले. स्ट्रोक मिश्र दुहेरी प्रकारात हेमंत पयेर व सोनाली मालुसरे यांच्या जोडीने सुवर्ण पदकाचा वेध घेतला. राज्यस्तरीय वूडबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे बक्षीस वितरण वूडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आशिष देशमुख, माजी आ.डॉ मिलिंद माने, गिरीश गदगे,वूडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया चे महासचिव अजय सोनटक्के, खजिनदार प्रवीण मानवटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Exit mobile version