शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन
मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई महापालिका हे आमचे आगामी टार्गेट असून,ती आम्ही जिंकणारच,असा निर्धार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जनआशीर्वाद यात्रा मुंबईत सुरु झाली.यावेळी त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मुंबईतल्या जन आशीर्वाद यात्रेत राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही, अशी चर्चा उभ्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र मुंबईतलं पहिलं भाषण आवरुन राणे थेट शिवाजी पार्कवर गेले आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी राणेंंसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.
आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून अशीच प्रगती कर असं म्हटलं असतं, शिवसेनेचा मुंबई मनपातील 32 वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणार्या निवडणुकीत भाजपचं सरकार येईल,
नारायण राणे,केंद्रीय मंत्री